अढी
अढी
1 min
248
कर जुळवूनी दोन्ही
विनवतो देवा तुला
सोड अढी मनातली
नभा दे दान भुईला
वर्षावानं अमृताच्या
तरारेल पिक सारं
शेत शिवारा मधून
गात जाईन रे वारं
पुस अश्रू लेकरांचे
किती बघतोस अंत
दोन वेळ जेवणाची
सारी पडलीय भ्रांत
तुझ्यावर भिस्त सारी
नको अवकृपा अशी
जगण्याची ही उमेद
तूच वाढव जराशी
