अभ्यास ( अभंग रचना )
अभ्यास ( अभंग रचना )
1 min
353
करते तयारी I शाळेत जाण्याला I
घरी थांबायला I सांगे आई ॥ १॥
आई बाबा दोघे I नाही कामा जात |
राहती घरात I तेही सदा ॥ २ ॥
काय झाले काही | मला ते कळेना |
खेळा पाठवेना | मुलींमधे ॥ ३ ॥
पाटी ती घेवून I अभ्यास करते |
पुन्हा ते लिहते | पुसोनिया ॥ ४ ॥
कोणता आजार | पसरला देशी |
घरात कोंडशी | हा कोरोना ॥ ५ ॥
