STORYMIRROR

Anita Bodke

Others

4  

Anita Bodke

Others

अभंग

अभंग

1 min
389

अरे थांब कृष्णा

किती धावू मागे

जिवा धाप लागे

धावुनिया


नाद लावुनिया

म्हणे जग साधा

इथे फक्त राधा

वेडी ठरे


किती काळ आता

तुझी वाट पाहू

अशी उभी राहू

वाटेवरी


तुटे तीळ तीळ

इथे जीव वेडा

तुला रे गराडा

गोपिकांचा


कशी पोहचावी

हाक माझी सांग

लागला ना थांग

देवा तुझा


तुला ना कळाली

वेडी प्रीत माझी

राधा तरी राजी

युगायुगे


एक व्हावा देह

एक व्हावे मन

नको आता 'पण'

दोघांमध्ये


Rate this content
Log in