STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

अभंग

अभंग

1 min
219

संत एकनाथ ।पैठण गावचे ।।

संस्कृत भाषेचे ।अभ्यासक ।।


जर्नादन स्वामी । गुरू हो मानले ।।

शिक्षण घेतले ।। वेदाध्यायी ।।


आदर्श गृहस्थी । सागर दयेचा ।।

आदर गुरूंचा ।। करीतसे ।।


पूर्ण गुरूकृपा । तयांना लाभली ।।

धन्यता मिळाली । जीवनात ।।


अभंग रचले । भारूडे लिहिली ।।

प्रसिद्ध जाहली । जगतात।।


पत्नी ही गिरीजा। दोन गुणी मुली ।।

हरी अभिमानी । मुलगा हो ।।


मुकी जनावरे । प्रिय हो नाथांना ।।

मुखी घास त्यांना । भरिविसी ।।


Rate this content
Log in