STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

अभंग देवीचा

अभंग देवीचा

1 min
361

स्वच्छ करू घर । जाळी पण काढू ।।

खोटेपणा सोडू । जीवनात ।।


नवरात्र दिन । झाला सुरू आज ।।

देवी लेते साज । सुंदरसे ।।


देखणी आरास । देखणे हे रूप ।

अप्रतिम खूप । नेहमीच ।।


देवी माताराणी । मखरी बैसली ।।

मनात ठासली । निरतर।।


सुख संपत्ती दे । आरोग्य उत्तम।।

माय सर्वोत्तम । तू आमची ।।


Rate this content
Log in