STORYMIRROR

Gauri Kulkarni

Romance

4  

Gauri Kulkarni

Romance

आयुष्याचं ऊन

आयुष्याचं ऊन

1 min
23.2K

आंबट गोड कैरी जिभेवर रेंगाळली

रेंगाळताना तुझ्या आठवणी ताज्या करून गेली

बंधच आपले असे होते की नकळत आपण भेटलो

आठवणींच्या जगात पुन्हा पुन्हा भटकलो

न मागितलेलं देऊन ओंजळ भरून टाकलीस 

परतून येण्यासाठी हक्काची वाट तयार केलीस

तुझ्या वाटेवर येताना थबकतात पावलं त्याच ठिकाणी आजही

आपलं गुपित आठवून सावली इतकंच लोभस भासतं आयुष्याचं ऊनही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance