आयुष्याचे रंग
आयुष्याचे रंग
1 min
664
बेरंगी जगण्याचा कशाला
करतोस आतोनात प्रयत्न
निराशेच्या भोवर्यात गुरफटुन
नेस्तनाबूत करतोस स्वप्न
कशाला लपवतोस स्वतःला
जेव्हा तू आहेस खरा
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास
सोसावा लागतो कष्टाचा वारा
आयुष्याचे रंग असतील जरी फिके
नव्याने रंग भरायला कर सुरुवात
सजव साऱ्यांना घेऊन सोबत
नवरंगांची रांगोळी दारात
