आयुष्य
आयुष्य
1 min
11.8K
नदीच्या प्रवाहात
दुःखाच्या वादळात
सर्व विरक्त असतं
स्वप्नांच्या बहुरंगी जगात
भावनेच्या पुरात
शब्दांच्या झंझावातात
सर्व आरक्त असतं
कल्पनेच्या लालबुंद विश्वात
गुलाबी गालात
यौवनाच्या बहरात
सर्व आसक्त असतं
प्रीतीच्या हिरव्या वनात
पावसाळी उन्हात
कोवळ्या किरणात
रंगाचे मन व्यक्त असतं
इंद्रधनुष्यी नभात
डोंगराच्या रानात
पळसाच्या रंगात
सारे एक आणि विभक्त ही...
माझ्या या सप्तरंगात...
माझ्या या सप्तरंगात...