आयुष्य वेगळ वळण घेत
आयुष्य वेगळ वळण घेत


आपलं आयुष्य
वेगळं वळण घेत
घड्याळाच्या काट्याप्रमाणे
हे पुढे जात असतं
पावसाच्या पडणाऱ्या
थेंबाप्रमाणे ते कोर असत
आणि आठवणीच्या उन्हात ते
रुख रुखं तापत असत
आयुष्याच्या पुस्तकात
भूतकाळाच पान असत
आयुष्यात होणाऱ्या चुकांना
ते मागे टाकत
आयुष्याच्या वळणावरती
अनेक माणसं भेटतात
सोबत असूनही
एकाकी करतात
आयुष्याच्या वळणावरती
काही माणसं क्षणिक भेटतात
दूर जाऊनही ती
क्षणात मनात घर करतात
आयुष्याच्या वळणावरती
आयुष्य कोऱ्या कागदा सारख
हलकं होतं तर
कधी अनुभवाचं दगड बनत.