आयुष्य माझं माझंच राहीले...
आयुष्य माझं माझंच राहीले...




पाहिली होती स्वप्ने तुझ्या आयुष्यात जगण्याची
तुझं आयुष्य माझ्या आयुष्यात रमण्याची
वाटत होते तुला अलगद कळतील माझ्या भावना मनातील
ओठी न येणाऱ्या शब्दांनाही तु समजुन जाशील
सीधी बात असेल आपल्या आयुष्यात नसेल कुठली आड
आयुष्य आपले भरुन जाईल प्रेमाने फार
पण वाटते नशिबात नव्हते असे काही लिहिलेले
म्हणून तर माझं आयुष्य माझं राहिले