आयफोन प्रेमी
आयफोन प्रेमी
1 min
2.3K
एक आयफोन द्या मज आणुनी
अनब्लॉक करेल मी स्व पासवर्डने
भेदून टाकील व्हाट्सएप नि फेसबुक
लाईक्स चा पाऊस नि डी.एस.एल.आर डीपी ने
मग उठता बसता सेल्फी सेल्फी
नवीन एप्लिकेशनची मांदियाळी
येता व्हायरसचा कर्दनकाळ
अँटीव्हायरसची होळी
हाय व्हॉल्यूमने जाईल दुमदुमून
आसमंत सारा
रात्रंदिवस चॅटींगचा धुरळा
अनब्लॉक आश्रितना देईन न थारा
