आवरा मना
आवरा मना
1 min
11.6K
भूत आहे की नाही?
कोणी पाहिले ?
कोणी नाही !
नसते भूत कोठे
नसतो मुंजा पिंपळी
खेळ सारे हे मनाचे
भीती ह्रदय जाळी
मानवी कल्पना
व्यर्थ वल्गना
लोभ मोह स्वार्थ
अडकवी सर्वा
मोहमाया जाळी !
देव वसे मनो मनी
दानव ही मनो मनी
भावना आवरेना
दिसे भासे जनीवनी !
म्हणूनी मानवा
आवरा त्या दानवा
मनातल्या भूता
आवरा भावना
दिसेल तुम्हा देव ना