Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashwini Kulkarni

Others

4.7  

Ashwini Kulkarni

Others

आठवणीतले क्षण

आठवणीतले क्षण

1 min
22.6K


 एक दिवस पावसाने अचानक साद दिली

 विसरलीस ना मला म्हणत खिडकी ठोठावली, 

 आधी थोडी घाबरली मग काहीशी सावरली, 

 तुला रे विसरीन कशी म्हणत मी ही साद दिली.......

 पाऊस आणि मी मग मस्तपैकी गप्पांची मैफिलीच झाली, 

आठवतंय तुला बाबा ओरडले की बसायची ओसरीत रडत,

आणि माझी समजूत काढायला तुझ्याही डोळ्यात पाणी यायचे नकळत,,,, 

कुणाला समजायचेच नाही आश्रू आहे की पावसाची ओघळ अशी मैत्री आपली,.... 

मग सांग तुला मी विसरीन कशी.

 हो ग आठवतय मला पण गेले ते क्षण 

आणि उरल्या त्या फक्त आठवणी असे म्हणत त्याच्या डोळ्यात आले पाणी,,, 

आता नाही म्हणत येरे येरे पावसा कुणी अशी गाणी,

कागदाच्या होड्या पाण्यात सोडून नसते माझ्या स्वागताची तयारी, 

नको रे हिरमुसु असा नाही त्यात या भाबड्यांची चुकी, आम्हा मोठांचेच चुकतेय 

 आज कालच्या पसरलेल्या रोगराईने होते आहे रे खूप जीवितहानी,

पाऊस आला हो घरात म्हणून हे शब्द पडतात तुझ्या कानी

 तू हळवा तुझ्याही डोळ्यात येते पाणी, 

  अरे शेतकऱ्याची आस तू.. 

  तहानलेल्या जीवाचा 

  ध्यास तू... 

 किलबिलनाऱ्या पक्षांचा आवाज तू.... 

आणि बरका आजच्या तरुण पिढीसाठी

तर पाऊस, टपरीवरचा चहा, आणि त्यात खूप साऱ्या गप्पा

हें मोहरलेलं वातावरण जणू त्यांच्या साठी मंतरलेले क्षण, इतका खास तू,, 

 अरे तू आहे म्हणूनच आहे सृष्टीला अस्तित्व,

तू नसशील तर होईल सर्वच उद्धस्त,

एवढे ऐकून खूष झाला बिचारा गालावरची 

ओघळ पुसत 

पुंन्हा येतो म्हणाला,,, 

पुन्हा येतो म्हणाला,,, 


Rate this content
Log in