Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nayana Gurav

Others

3  

Nayana Gurav

Others

आठवणीतील गाव

आठवणीतील गाव

1 min
157

माझ्या गावाकडची गं वाट

चहूबाजूनी झाडी दाट

नागमोडी रस्ता तुडवी

उंच डोंगर आणि घाट

काजू-फणसाची बाग

आंब्यांच्या गं राई

जांभळी वर धावते

सानुली खारुताई

गावाच्या गं वाटेवर 

शेत-शिवारं डोलतं 

ताडा-माडांच्या संगे

उंच नारळी झुलते

पाटामधून वाहते

झुळझुळ गार पाणी

वाऱ्यासंगे गाती पाने

रानपाखरांची गाणी

गावाकडची गं माणसे

अशी साधी अन भोळी  

काट्या-कुट्याने भरली जशी

आंबट-गोड करवंदीची जाळी

Rate this content
Log in