आठवणींचे पक्षी
आठवणींचे पक्षी
1 min
337
आठवणींचे पक्षी फुलवतात पिसारा एकांती
झळकू लागते क्षणा क्षणाने गोरी तुझी कांती
उबदार आठवणींच्या चादरीत घ्यावे लपेटून
चादंण्यांच्या अगंणात विचारांनी जावे झपाटून
आठवणींचे पक्षी करती माळावर गलका
सुमधूर किलबिलाटाने मळा होई हलका
आबंटगोड फळे शेलकी देती जिवनाला स्वाद
आस्वाद घ्यावा क्षणोक्षणी बाजूला ठेवूनी वाद
आठवणींचे पक्षी पाहती वाट आपल्या पिलांची
पंखाना लावून बळ उंच भरारी मारणारांची
पाहते हे घर विखुरलेले वाट वाकडी करा जरा
पिल्लांसोबत आसऱ्याला या घरी तुम्ही जरा
