आठवणींचा कप्पा...
आठवणींचा कप्पा...


मनातल्या आठवणींच्या कप्प्याने म्हटले मला
करु का सरलेल्या दिवसांची परत सैर तुला
लहानपणी होती तुझी दंगामस्ती
चाॅकलेट मिळाल्यावर कशी खुले तुझ्या गालावरची खळी
बोट धरुन बाबांचे तू जायची फिरायला
येताना घेऊन येई खाऊचा पुडा
आईच्या काऊ चिऊ बोलावून तू घास खाई
आईच्या अंगाईनी गुपचुप झोपी जाई
शाळेत मिळालेल्या शाबासकीची सांगण्याची आईला असे तुला घाई
तुला बक्षिस मिळताना अभिमानाने सांगत असे आई
दहावी-बारावीच्या पास झालेल्या पेढ्याचा वास अजूनही दरवळतो का
सोपं नव्हतं हे यश केली होतीस तू त्यासाठी मेहनत खास
काॅलेज विश्वाची पायरी चढलीस
मित्र-मैत्रिणींबरोबर या नवीन विश्वात रमलीस
हातात पदवी घेऊन ही पायरी ओलांडलीस
स्वतःच्या पायावर उभे राहण्याची होती ती वेळ हिंमतीवर एक छान नोकरी मिळवलीस
अशीच आयुष्याची पाने खूप पुढे सरकत गेली
पण मी मात्र तुझ्या मनातली साथ नाही सोडली