आठवणी
आठवणी
1 min
221
आठवणीत रमण्याच सुख
असतं आभाळाएवढ
साठवणीच्या संदुकातून
काढता येत पाहिजे तेवढं
एक एक आठवण असते
जिवापाड जपलेली
प्रेमाची माणस असतात
प्रत्येक चौकटीत मापलेली
प्रत्येक कोपर्यात असते
दडलेली एक आठवण
भडाभडा बोलता येत नसलेली
मनातील भावनीक साठवण
एकांतात कधी कधी
आठवणीत रमता येतं
पापण्यातल्या आसवांना
सहज हेळकांडता येतं
असचं रमाव आठवणीत
घ्यावा मोकळा श्वास
नव्या आठवणीत रमताना
आनंदी जगण्याचा घ्यावा ध्यास
