STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

आठवांचा हिंदोळा

आठवांचा हिंदोळा

1 min
282

नूतन वर्षी नूतन काली , 

 आठवांचे तरंग उठती

मन होई वेडेपिसे मम

आठवणींच्या हिंदोळ्यावरी


बालपणीची मजाच न्यारी

खेळ खेळलो नानापरि

उष्टीच चिंचा बोरे आवळे 

आठवणींच्या हिंदोळ्यावरी


शैशवाच्या उंबरठ्यावर

मौजमस्ती खोड्या करी

अभ्यासाला आई दटावी

आठवणींच्या हिंदोळ्यावरी


शैशवातूनी मुग्ध यौवन

आकर्षण वा दर्शन भारी 

मनोमनीचे गुपित सांगी

आठवणींच्या हिंदोळ्यावरी


घर संसार मध्यमवयी

कर्तव्याची पूर्तताच सारी 

मैत्रिणींच्या अचानक भेटी 

आठवणींच्या हिंदोळ्यावरी


भावभावनांचे आवर्तन

प्रत्येक टप्प्याची ललकारी

आजही निनादे मम ऊरी

आठवणींच्या हिंदोळ्यावरी


कातरशा अशा संधीकाली

आस नुरली काहीच ऊरी

तरीही शांत निवांत वेळी 

आठवणींच्या हिंदोळ्यावरी


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ