STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

आत्महत्या

आत्महत्या

1 min
314

विकोपाला जाते का 

ही खदखदणारी वेदना 

का जाते विसरली 

सारी तुझी संवेदना 

का करतोस स्वतःला 

अंत करण्यास प्रवृत्त 

काय घडेल जेव्हा 

समजेल सार्यांस हे वृत्त 

आत्महत्या नसे पर्याय 

जिवन संपवण्याचा 

आपल्या उनिवांना लपवत

अंतिम मार्गक्रमणाचा

साहसाने जा सामोरे 

नको असले मार्ग साकारू

संयमाने सापडेल दिशा

एकीचे नवे उपाय वापरू


Rate this content
Log in