STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

आसवांची गाथा

आसवांची गाथा

1 min
397

कशी व्यक्त करु सांगा

माझी आसवांची गाथा

कुणा नाही समजली

माझ्या हृदयाची व्यथा


स्वार्थ साध्य होता त्यांनी

ओळखण्या दिला नकार

झाले हृदयाचे तुकडे किती

तरी न काढू शकलो हुंकार


तुटले स्वप्नही सारे माझे

होण्याआधीच साकार

ह्या वाटेतील प्रत्येक ठेच

देत होती जीवना आकार


तरीही ना थकलो कधी

ना मानली कधीच हार

जगलो आणि जगतोय

न होता कुणावरही भार


Rate this content
Log in