STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

आशेची नवी पहाट

आशेची नवी पहाट

1 min
197

चौदा मार्च दोनहजार वीस या दिनी

पुण्यात प्रथमच लाॅकडाऊन झाले

कोरोनाच्या हैदोसाने जन हादरले

माणूसकिला माणूस दूर लोटू लागले...


जगभरात हाहाकार माजवला कोरोनाने

लाखो जीवितांचे यात जीव गेले

का हो दोष या मानवांचा असावा?

धरेवर मृतांचे खच की हो पडू लागले...


या वर्षी पुन्हा सारे तेच झाले सुरु 

मधे दोन महिने जरा सुरळीत वाटले

माणसाच्याच हातून होणार्‍या चुका 

निदर्शनास आल्या ,लाॅकडाउन पुन्हा वाढले,...


आदित्य तोच पण सृष्टीवरील दिन नवा

कोरोनाचे सावट जाईल केव्हा हाच विचार येतो बरे

रोज वाचनात येतेय कोरोना घटत चालला

आशेची नवी पहाट नक्कीच येणार हे मात्र खरे...


Rate this content
Log in