STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

आरती देवीची

आरती देवीची

1 min
28.4K


जय जय भवानी

मन रमनी

महिषासूर मर्दिनी

जय जय भवानी ।।धृ।।


लेहून हिरवा

पितांबरं

वर चोळी बुट्टेदार

जय जय भवानी ।।


हाती घेऊनीया

तलवारं

वाघावर स्वार

जय जय भवानी ।।


पायी बांधूनीया

रुम झूम

वाजती पैंजन

जय जय भवानी ।।


शोभे कपाळी

मळवट

वर सोन्याचा मुखूट

जय जय भवानी ।।


शक्ती दुर्गेची

अफाट

केला दैत्याचा नयनाट

जय जय भवानी ।।


आरती लाऊनीया

दिप ज्योती

कापूरच्या वाती

जय जय भवानी ।।



Rate this content
Log in