आरसा
आरसा
1 min
160
आरसा छबीला
दाखवतो खरा
चेह-यामागचा
वास्तव चेहरा
ख-या चेह-याच्या
मागे असतात
खूप दडलेले
मुखवटे आत
हे जग नकली
चेह-याला फसे
पश्चाताप होई
असली समजे
कर्म समजते
असली छबीला
भाव झळकती
सांगे आपल्याला
कितीही लपवा
आरसा दाखवे
मनातले सारे
बरोबर दिसे
बा परमेश्वरा
मोठीच देणगी
मानव जातीला
ओळखा स्वतःसी
