STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

आरसा ( सहाक्षरी )

आरसा ( सहाक्षरी )

1 min
244

दुसऱ्यांसाठी हो

तत्पर सदा नी

चालतांना घेतो

काटे उचलुनी ॥१॥


शुभेच्छा सर्वांना

देतसे जरी मी

आनंद हो तसा

येतसे ओंजळी ॥२॥


अनावर राग

झालाच तरीही

जागी त्या स्वतःस

ठेवूनच पाही ॥३॥


इच्छा ही स्वतःच्या

अंतरी ठेवूनी

हास्य दुसऱ्यांच्या

मंगल त्या क्षणी ॥४॥


स्वतःला शोधाया

निघालो तरीही

शोध काहो माझा

संपतच नाही ॥५॥


आरसा दाखवी

गुज अंतरंगी

झाली अशी कशी

जादू बहुरंगी ॥६॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन