आरसा बोलू लागला ( अष्टाक्षरी )
आरसा बोलू लागला ( अष्टाक्षरी )
1 min
213
स्मीत गाली पहायला
विसरला हसायला
वेळ राहीलाच नाही
एकांतात रडायला ॥१॥
जमा खर्च ताळमेळ
धाव धाव करायला
आभाळच फाटलय
टाके घाली शिवायला ॥२॥
राब राब राबतोस
असा कष्टात जगला
हरवले बालपन
खांदा जबाबदारीला ॥३॥
अरे काय तुझी दशा
पही जरासेच तुला
स्वतःस वेळ देत जाना
आरसा बोलू लागला ॥४॥
