आरोग्य दिन (अभंग)
आरोग्य दिन (अभंग)
1 min
415
देव ते पळाले | हे तारणहार I
आजचे डॉक्टर | समाजात ॥ १ ॥
महामारी आज | पहा जागतिक |
माजे अराजक I कोरोनाचे ॥ २ ॥
बिना मास्क तरी | करिती ते सेवा |
एक किट दयावा I डॉक्टरांना ॥ ३ ॥
भारतात सदा | अंधश्रध्दा वाढे |
पुन्हा तेच पाढे | या भक्तांचे ॥ ४ ॥
आरोग्य दिन हा | जागतिक पहा |
दीन डॉक्टर हा | भारतात ॥ ५ ॥
