आनंददायी बालपण
आनंददायी बालपण
1 min
160
बालपण तो आपला
होता अनंत सुखाचा
होता तेव्हा प्रत्येकच
राजा आपल्या मनाचा.
घेत होतं आनंद तो
वास्तविक जीवनाचा
त्रास नाही कसलाही
सुख दुःख वेदनांचा.
बालपण असायचा
निरागस तो मनाचा
आलं जरी राग कधी
असायचा तो क्षणांचा.
इच्छा आणि आकांक्षांना
नसे बंधन कुणाचा
हवं तसा अट्टाहास
पुर्ण करता यायचा.
बालपण तो खेळावा
आयुष्यात कायमचा
वाटे माझ्या मना आज
यावा तो क्षण हर्षाचा.
