आनंदाने कवेत घेतले
आनंदाने कवेत घेतले
किती दिवस झाले
मन रडून थकले
मनाला कळले ना
कुठे ते चुकले
प्रत्येक डोळ्यातील अश्रुंना
समजावले मी किती
प्रत्येक तुझ्या मिलनाला
आनंदाने कवेत घेतले
समर्पित करणार होते
तुझ्या असण्याची साक्ष
कुणालाच सामावले नव्हते
ना दिले मी हक्क
कणकण आयुष्याचा
संपत आला खरा
अंदाज या मनाने
असल्याची साक्ष देत होता
कणकण साचवून
स्वप्नात मनातच सजवले
मात्र विरहात माझ्या
प्रत्येक शब्द बुडाले