आनंदाला उधाण
आनंदाला उधाण
1 min
102
आले आनंदाला उधाण
काय वाणू मी गुरु ख्याती
मज पामरास गुरुने
गुरुमंत्र देवून धरीले हाती
नव्हता गंध भक्तीचा
न आवडे भजन
न केले श्रवण किर्तन
मनोभावे न केले पुजन
प्रेमळ सद्गुरु मायने
दिला मज ठाव
मी पणाचा नाश होवून
अहंकारावर घातला घाव
झाली मज गुरुकृपा
बनली लाडकी लेक
दुजा नसावा भाव मनी
घडून यावी गुरुसेवा नेक