आनंदाचे झाड
आनंदाचे झाड

1 min

12.1K
आनंदाचे झाड असे हे
कधीही कुठेही लागते
निर्मळ मनाच्या भूमीत
पटकन ते रुजते (1)
मऊ मऊ माती त्यागाची
आळे निरपेक्षतेचे
मऊशार प्रेम शिडकावे
उमलती कोंब तयाचे (2)
मंद वात आपुलकीचा
झाडाला रिझवे
गर्द प्रेमछत्राखाली
वारा तया डुलवे (3)
ह्या झाडाची महती श्रेष्ठतम
जो लावे तो सुखावे
आपणासंगे इतरांनाही
सुखानंदे डुलवे (4)
भेद भाव ना माहित त्यास
वात्सल्याचा पाड
मन श्रीमंत करी असे
आनंदाचे झाड !! (5)