आनंद आणि वेदना
आनंद आणि वेदना
1 min
234
आनंद आणि वेदना
मोजता येत नसतात
व्यवहाराची सारी परिमान
कमी पडत असतात.
आनंदाची असते लहर
वेदनेचा असतो डोंगर
लहर आणि डोंगर
यात असते अंतर.
लहर आणते चैतन्य
डोंगर चढवत नाही
यांची तुलना करून
मन शांततेने पाही.
लहरीत जातो वाहवत
डोंगर चढताना शांत
आनंद आणि वेदनेत
दोन्हीत मन अशांत.
आनंदात वाहून पहा
वेदनेत राहून पहा
जग दिसे न्यारे
मनापासून जगुन पहा.
