आंबोळी...!
आंबोळी...!
1 min
310
आंबोळी आमच्या घरचं
लहानपणीचं हक्काचं खाणं
ऐनवेळीच्या भुकेला
जणू दूर लोटण्याचा बाण
तांदूळ पिठाला मायेनं
दिलेलं ते एक विद्रुप रूप
कुरुपतेसाठी खेडोपाडी
वापरलं जाणारंच ते माप
पण रूपावर जाण्यापेक्षा
गुणावरच हिला मिळतो मान
म्हणून तिच्या कौतुकासाठी
गावे वाटे तिचे सुंदर गान
चटणीसोबत चव चाखणे
आंबोळीची मजा लुटणे
चुलीजवळ अडून बसणे
हेच व्हायचे स्वप्न सदा पडणे
आईच्या हाताची गोडी
आजही आठवणीने आठवते
आंबोळीचे डोहाळे जणू
आठवणही अजून पुरवते
पण आता आंबोळी
घरी कधीतरीच होते
तरीही तिची गोडी
मात्र अजूनही तीच असते....!!!
