आम्ही साथी (मैत्रीण )
आम्ही साथी (मैत्रीण )
तुझ्या माझ्या साथी ची
यारीच खूप पुरानी आहे
तुझ्या विना मी नाही
माझ्या विना तू नाही
अशी आपली कहाणी आहे
माझ्या -हदयात तू
आणि तुझ्या -हदयात मी
देह दोन असूनही
आत्मा मात्र एकच आहे
माझ्या प्रत्येक सुखात तूच
माझ्या प्रत्येक दुःखात ही तूच
माझ्या यशाच्या प्रत्येक
शिखरावर तुझ्याच
आपुलकीचा थाप आहे
तुझ्या माझ्या मैत्रीत
एक वेगळा गंध आहे
न तुटणारा रेशमी धाग्याचा
विश्वास रूपी बंध आहे
ना स्वार्थ ना अहंकार आहे
ना अटी ना नियम आहे
तुझी माझी मैत्री म्हणजे
कधी कट्टी तर कधी बट्टी आहे
जखम तुला झाले
तर घाव मला होते
आश्रू तु गाळले तर
काळीज माझे जळते
आम्ही दोघे साथी
वचन बद्द एकमेकाशी
जेवढे आयुष्य़ आहे
आमच्या हाती जगु आम्ही
एक दुसऱ्या साठी
अशी आहे आमची यारी
आम्ही दोघी एकमेकाला प्यारी
याराना आहे आमची न्यारी
आमच्यातच आमची दुनिया सारी
