STORYMIRROR

Chandan Pawar

Others

3  

Chandan Pawar

Others

आम्हांस फक्त शिकवू द्या

आम्हांस फक्त शिकवू द्या

1 min
308

शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य

आम्हांस तुम्ही जपू द्या ;

सरकारी शाळा टिकवण्यासाठी

आम्हांस फक्त शिकवू द्या .


आम्ही उघडतो शाळा

आम्हीच करतो साफसफाई ;

शाळेची घंटा वाजवणारे

आम्हीच आहोत " शिपाई ".


पोषण आहारात खिचडीभात

करणारे आम्हीच "आचारी ";

शिक्षणाच्या शर्यतीत सांगतील

तसे नाचणे आमचे लाचारी.


शिक्षण हक्क कायद्याबाबत

वेगवेगळे तर्कवितर्क दिसतात ;

टपालांच्या आवक-जावकांत

शिक्षक " क्लर्कच "भासतात .


शालेय बांधकामे करून

"गवंडी "ची धुरा आमच्याच हाती ;

" गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु "या सुभाषिताची

झालीय आज सर्वत्र माती .


विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी

आम्हांला"टेलर "व्हावे लागते ;

राजकीय व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी

आम्हांला सेलर "व्हावे लागतात .


निवडणूक -जनगणना अशैक्षणिक

कामांचे ही कपाळी "चंदन ".

"BLO " ची नवी भूमिका सोसतांना

नको त्याला आमचे वंदन .


ऑनलाइन- ऑफलाइन कामातही

नेहमीच असतो व्यस्त ;

शिकवायला वेळ न मिळाल्याने

गुणवत्तावाढीसाठी आम्ही त्रस्त .


आदर्श व वास्तवतेचा

गुरुजी घालतोय मेळ .

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी

आम्ही मागतोय वेळ.


आम्हांस शाळाबाह्य न करता

अशैक्षणिक कामे काढून घ्या;

उज्वल भारताच्या भविष्यासाठी

आम्हांस फक्त शिकवू द्या.



Rate this content
Log in