आमचं आयुष्य
आमचं आयुष्य
1 min
177
एक स्त्री म्हणून जगताना
आमचं आयुष्य उलघडाव
मुलगी म्हणून आईवडीलांनी
आम्हाला पुरेपूर घडवाव
लहानपणी तळहातावरल्या
फोडाप्रमाणे जपाव
खेळता खेळता कधीतरी
आईच्या पदराआड लपाव
शाळा काॅलेजात जाताना
धडधडे आईचे काळीज
माझ्या लेकरावर कधी
नराधमांची पडू नये वीज
सौंदर्य हा दागिना आम्ही
कसा जपावा जिवापाड
रहाव का सदा आम्ही
घरातल्या पडद्याआड
सारी स्वप्ने ठेवावीत का
पोतडीत गुंडाळून
सुरुंग लावावा का त्याला
सारे काही कळून
बंद करावे का काळ्यांनी
उमलायचे आता
का कुढत जगावे तीने
फूलाकडे पाहतापाहता
प्रत्येक घरात उमलते हो
अशी नाजूक कळी
नका खूडू तुम्ही अशी
तिच्या गालावरली खळी
