आमचे नाक आहे वर
आमचे नाक आहे वर
1 min
180
मी मी करूनही बडवीत छाती
उभे राहती श्रेयासाठी
एकमेकांची ओढती तंगडी
श्रेयासाठी सारी कुलंगडी
मीच कसा मग बाजीराव
सारे काही मलाच ठावे
माझ्यामुळे तर विश्व उभे
सोम्यागोम्या ने दूरच राहावे
मी उभा त्या शिखरावरती
येथे नाही कुणास जागा
पायथ्याशी उभे राहुनी
आप आपला हिशोब सांगा
माझ्यामुळे फिरते धरती
चंद्रसूर्य हिन नभी उगवती
पाहुनी मग माझी उंची
तारांगणास ही वाटे हेवा
मी मी वाले नमुने असले
सदैव आपटती मग तोंडावर
पाठ लागली जरी जमिनीला
म्हणती आमचे नाक आहे वर
