Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

आली आली निवडणूक

आली आली निवडणूक

1 min
238


पाच वर्षांचं राज्य झालं 

निवडणुकीचं आलं वारं

वातावरणात चैतन्य आलं 

आणि सैराट झालं सारं  (1)


तिकीटासाठी धडपडे

नारळ प्रचाराचा फुटे

गाजावाजा चहूकडे

सत्तेसाठी सर्व पुढे    (2)


हौशे गौशे नवशे जमती

खाणे पिणे मजा लुटती

मतांसाठी हात जोडती

सारे काही सत्तेसाठी   (3)


गरीबांची कणव करती 

प्रचारास दारी पोचती

कर्णाचा आव आणती

दान देऊनी तृप्त करती  (4)


भाषणबाजी तावाने करती

प्रतिपक्षावर टीकास्त्र सोडती

आश्वासने ढीगभर देती

सारे काही मतांसाठी  ( 5)


निकाल जाहीर होता

पाठच की फिरवती

सत्तेची खुर्ची मिळता

सर्व काही विसरती    (6)


Rate this content
Log in