STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

आलेपाक दडपे पोहे...!

आलेपाक दडपे पोहे...!

1 min
3.4K


दडपे पोहे दडपे पोहे

हा प्रकारच वेगळा आहे

मोजक्याच तोंडाचा तो

आवडता पदार्थ आहे


केव्हाही कधीही कितीही

ही याची

ठराविक घरी ख्याती आहे

कोणालाही आवडेल अशी याची

साधी सोपी गावठी रीत आहे


पोहे कांदा कोथिंबीर ओले खोबरे

शंगदाणा शेव टोमॅटो थोडे आले बरे

फोडणीचा थाट कडीपत्ता घालून

मिरचीच्या तडक्यासह कोबी

वाढवीतो लज्जत चवीची हे खरे


सजली थाळी पाहून मन

खरोखरच अचंबित होते

दडप्या पोह्याचा स्वाद घेताना

अंतरमनही तृप्ततेने प्रसन्न होते


अशी अवीट गोडीची पाककृती

घरोघरी इथेच फक्त होते

म्हणून ती सर्वांमुखी पडते

जेव्हा सरंजामी खाद्याचे दर्शन घडते

तेव्हा कोठे परमानंदाचे सौख्य मिळते ....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन