STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

आला पाऊस

आला पाऊस

1 min
28.2K


अग्नी विरहाचा किती

जाळे माय धरणीला

वाट सख्याची पाहून

जीव लागे झुरणीला


आला पाऊस साजण

झाला आनंद धरेला

मिळे श्वासामध्ये श्वास

गंध धुंद जीव झाला


आला पाऊस पाऊस

गंध मातीचा घेऊन

धुंद झाली वसुंधरा

थेंब अमृत पिऊन


आला पाऊस पाऊस

राने ओलीचिंब झाली

पशु पक्षी झाडे वेली

सारी सृष्टी सुखावली


आला पाऊस पाऊस

बळीराजा सुखावतो

स्वप्न हिरवं डोळ्यात

मनी अंकुर फुटतो


आला पाऊस पाऊस

नदी नालेही तुडुंब

दिसे सुखी संसाराचे

डोळ्यामध्ये प्रतिबिंब



साहित्याला गुण द्या
लॉग इन