आला पाऊस मुसळधार..
आला पाऊस मुसळधार..
विजांचा कडकडाट , ढगांचा गडगडाट
पक्षांचा किलबिलाट ,विजांचा लखलखाट
अवतरला पाऊस मुसळधार
धरणीवर आज मोठ्या थाटात
आल्या सर सर पावसाच्या सरी
सुटला सोसाट्याचा वारा
घेऊन आल्या सोबत गारा
गर्द शिवार झाले नदी नाले
ओथंबले पानापानांवर झळकले
मोती इंद्रधनुने रंग उधळले नभोमंडपी
गारठली संध्याकाळ
झाली हिरवी चिंब पायवाट चोहीकडे गर्द हिरवे रान
विजांसवे आकाशात चमचमणारा
मुसळधार पाऊस पडला
झुल वेलींची पांघरूनी पाऊलवाटा सजल्या
नवी चकाकी येऊन साऱ्या खुदकुन गाली हसल्या..
आला मुसळधार पाऊस गंध मातीचा सुटला...
धारा पावसाच्या अंगावरती झेलून मी ही मग
थोडा आनंद लुटला...
