STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

आला आला वसंत आला

आला आला वसंत आला

1 min
241

पानगळ शिशिराची

आता थांबली गं सये

पालवी ही वसंताची

झाडांवरी फुलली गे  (1)


राजा ऋतुंचा वसंत 

वसुंधरेला खुलवी

कशी नटली अवनी

साज हिरवा लेऊनी  (2)


आला आला हा वसंत

उत्साहाने दिमाखाने

सृष्टी सौंदर्य सोहळा 

रंगे वसंतरंगाने   (4)


रोग पळवून लावू

लाभो आरोग्य सर्वांना

स्थिर होऊ जीवनासी

लाभो सुख सकलांना  (५)


आला वर्षारंभ सण

गुढीपाडव्याचा सखे

गुढी उभारुनी तया

बांधू तोरण सौख्याचे  (६)


नववर्षाचे स्वागत

करु आनंद सौख्यानी

लाभो आरोग्यसंपदा

ईश्वरासी विनवणी   (७)


Rate this content
Log in