STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

आला आला गणराया

आला आला गणराया

1 min
132

गणेश चतुर्थी , आगमन झाले

सकल भक्त हे , नाचाया लागले

किती कसे सांगू , आनंदी रंगले

भक्तिप्रेमाचे हे , मीलन जाहले


गजानना तव , रुप मनोहर

चिंता हरविसी , तूचि विघ्नहर

संकट कोरोना , येई जगावर

तारणकर्ता तू , सहाय्य तू कर


विद्या नि कलांचा , तूच अधिपती

संकट विघ्नांना , तूच हरविसी

बुद्धीदाता तू , पेच सोडविसी

संकटामधूनी , मार्ग दाखविसी


 श्रद्धा हो भक्तांची , आहे मनोमनी

हरशील चिंता , विघ्ने हरवूनी

प्रसन्न वदने , आरोग्य देऊनी

सकल जनता , सांगे विनवूनी


Rate this content
Log in