STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others Children

3  

Sarika Jinturkar

Others Children

आजोळच्या आठवणी

आजोळच्या आठवणी

1 min
667

सुट्ट्या कधी लागतात त्याची 

वाट आम्ही बघायचो 

आजी- आजोबा, मामा- मामीला  

भेटायला उत्साहात आम्ही आजोळी जायचो..🤗


 मामाच्या गावाची गोष्ट न्यारी  

आजी आजोबाच्या प्रेमाला 

जशी आमरसाची गोडी  


आजोळ खूप छान होतं☺️ 

 आम्हा बहिण भावांची होती चांगलीच गट्टी 

 सार्‍यांशी दो नव्हती कुणाची ही कट्टी


 लपंडाव, पत्त्यांचे खेळ रंगत 

 सगळे सोबत जेवायचो अंगत-पंगत  

हवी हवीशी वाटायची 

माचलेल्या आंब्याची संगत


 आजी आमच्यासाठी खूप काही 

नवीन नवीन पदार्थ बनवून खायला आणायची..  


आजीच्या हाताला चव पण खूप असायची  

एखादी गोष्ट सांगत मायेचा घास ती आम्हाला भरवायची..

  

आजीच्या पदराला हात पुसत तिच्याकडून गोड कौतुक करून घ्यायची आम्हाला भारी हौस असायची...😊


आजोबाही कडेवर घ्यायचे, 

 मोठ्या हौसेने आमचे लाड पुरवायचे  

मजा-मस्ती खोड्या केल्या तरीही नाही रागवायचे...


 मामा मामी ही आमच्यावर 

प्रेमाचा वर्षाव करायचे

 बाहेर गेले की गोड खाऊ 

आमच्यासाठी आणायचे 


 हसत-खेळत दिवस निघून जायचे

 सुट्ट्या कशा संपायच्या कुठे काय कळायचे..?  

घरी पुन्हा परत जायला पाय नाही वळायचे...


 भाग्यवंत आम्ही  

आजोळचे भाग्य आम्हास लाभले 

अजूनही मन रंगून जात 

आजोळच्या त्या अंगणात 

माया आजी आजोबांची

जशी पावसाची रिमझिम बरसात...


 मामाचं गाव आता कुठेतरी हरवले

 गतकालीन आठवणींना त्या आज मी जवळ बाळगले... 


 गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 

बालपणी अनुभवल्या मनसोक्त मी ज्या आठवणी...😌


Rate this content
Log in