Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Others

4.5  

kishor zote

Others

आज्जी ( अभंग रचना )

आज्जी ( अभंग रचना )

1 min
36


नाते ते प्रेमळ I बाबाची ही आई I

आईची ही आई I आज्जी अशी ॥ १ ॥


हट्ट ती पूरवी | घेते मांडीवर I

आणि खांद्यावर I झोपताना ॥ २ ॥


कोणी ओरडले | तिच्या मागे लपे I

आईबापा झापे I बाजू घेत ॥ ३ ॥


आवाज ती देते I नेहमीच मला I

शोधे पाहायला I घरभर ॥ ४ ॥


नशिबवान ती I मुले पहा सारी |

असे दोन्ही घरी | आज्जी जेंव्हा ॥ ५ ॥Rate this content
Log in