आजीची कहाणी
आजीची कहाणी
1 min
282
आजीची गोष्ट
अगदी रसभरित
गोल बसून भवती
सांगे खणखणीत
बोधप्रद गोष्ट
मला फार आवडे
एकदा सर्व बसलो
गोष्ट सांग गडे
तनू मनू बहिणींची
कथा खूपच न्यारी
दोन बहिणींनी
पराक्रम केले भारी
बुडणा-या मुलाला
ओढण्यांचा आधार
जोरात खेचले त्याला
वाचवले भर पाण्यात
गोष्ट शाळेत कळली
शाबासकीच मिळाली
मुख्याध्यापक बाईंनी
पाठ थोपटली
