आजची स्त्री
आजची स्त्री

1 min

11.7K
चूल अन मूल या चाकोरीबाहेर जगणारी
तरी घराला घरपण देणारी
स्वतःचं अस्तित्व जपणारी
सोबत सगळी नाती जपणारी
तू मी च्या वादात न अडकणारी
हातात हात देऊन सोबत चालणारी
प्रेमाची बरसात करणारी
क्षणाक्षणाला फुलणारी
हसतहसत संकटाला मागे सारणारी
ताठ मानेने जगणारी
अन्यायाला वाचा फोडणारी
प्रसंगी चंडिका अवतार धारणारी
घेतली उंच भरारी किती जरी
कुटुंबालाच सर्वस्व मानणारी
आजची "स्त्री"