STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

आईची महती

आईची महती

1 min
397

आई सकाळ कोवळी, जशी माया ममतेची।

आता गेली दूर देशी पुन्हा नाही ती भेटायची।।


सर आईच्या दुधाची ना, कुणाच्या प्रेमाची।

जन्म हजारो घेशीला, तरी सर ना हो आईची।।

ऋतू कोणता ही असो, आई, पहाटेला उठायची।

ऊन-वारा पाऊस असो, किती थंडी कडाक्याची

रती पहाटेच्या दवापरी, आई अंगणात दिसायची।।

अन दुधावरच्या साईवाणी, बाळाला जपायची।।

आता गेली दूर देशी पुन्हा नाही ती भेटायची।


रोज झोपायच्या आधी, ती, गोष्टी सांगायची।

अन निज निज बाळा अशी, अंगाई म्हणायची।।

रोज सकाळी उठून दरी सडा सारवण करायची।।

मी उठलो लवकर तर, पुन्हा निज म्हणायची।।

म्हण वेळ नाही झाली अजून सूर्यदेव येण्याची।

इतिहास, पुराणी ही गाती, महती आईच्या मायेची।।

आता गेली दूर देशी, पुन्हा नाही ती भेटायची।


कधी कळणार महती, या आईच्या प्रेमाची।

स्वतः उपाशी राहुनी, ती पोरांना जेवू घालायची।।

जात्यावरल्या ओवी आई, तोंडपाठ म्हणायची।

शिकलेल्या पोरांना माय, वेडी हो वाटायची।।

त्यांच्या वाटेवरले काटे, ती मायेने वेचायची।।

तरी पोटची पोर का ही दावी वाट वृद्धाश्रमाची

आता गेली दूर देशी, पुन्हा नाही ती भेटायची।।



Rate this content
Log in