आईची माया
आईची माया
1 min
3.5K
ज्याच्या नशिबी असते छत्र
त्यास लाभे आईची छाया
जगाच्या बाजारात सारे भेटते
पण भेटत नाही आईची माया
आईची माया
जपलिय मी हृदयात
आकाश भरारीचे स्वप्न
तिने भिनवलय माझ्या रक्तात
गाठले मी शिखर जरी
आईसाठी लहानच आहे
माझ्यासाठी भाकरी भाजताना चटके सोसणारी
माझी आई महान आहे
