STORYMIRROR

Kothekar yogita Sanjay Kothekar

Others

3  

Kothekar yogita Sanjay Kothekar

Others

आईचे ऋण

आईचे ऋण

1 min
804


ही माय माऊली , जन्मदात्री साऊली

तिच्यासम केली का तुम्ही इच्छांची होळी ?

म्हातारपणात तिच्यातू सोडून का जाई ?

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ॥


तुला लागले जरा , तुला दुखले जरा ,

तिच्या हृदयात जातात रे नाना या कळा

तिच्यासाठी तुझे मन झुरत का नाही ?

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ॥


तुझी स्वप्ने ही मोठी , तुझी भरारी मोठी

तुझ्यासाठी केली तिने झोळीही रिती

तुझ्या घरामध्ये तिज थारा का नाही

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ॥


आज जगी तू कोण , मोठा मानसन्मान

तिच्याच आशीषाचे फळ , याचे ठेव तू भान

तिच्या आशीर्वादाचे पांग फेडत का नाही

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ॥


नका सोडू हो तिला, नका ताडू हो तिला

तिच्याच उदरी तुमचा जन्म जाहला

जन्मदात्रीसाठी जीव तुटत का नाही

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ॥



Rate this content
Log in