STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

आई

आई

1 min
270

आई म्हणजे ... वात्सल्यरुपी

अखंड खळाळणारे झरा ...

अवघ्या विश्वातील अढळ

शाश्वत शब्द हाच खरा ...


जिथं क्षणभर विसावण्याचं

असते एक शितल छाया ...

चिरंतन प्रेमातनं साकारलेली

एक वेडी माया ...


आई म्हणजे ममत्वाची

असते साक्षात मूर्ती ...

सृष्टीनिर्मात्याची एक

अप्रतिम कलाकृती ...


आई म्हणजे निस्वार्थ

प्रेमाची एक फलश्रुती ...

शब्द अपुरे पडतात

वर्णिता तिची माहिती ...


आई म्हणजे जीवनशाळा

अनुभवया मिळतो तिथे

दुःखाचा कळवळा अन

हास्याचा उमाळा ...


आई म्हणजे ... अंगाई गीत

अवीट , सुमधुर जीवनसंगीत

नालंदा नसलं तरी पण एक 

चालतं - फिरतं विद्यापीठ


आई एक हक्काचं स्थळ

धाय मोकलून रडण्याचं ,

खळाळून हसण्याचं ...

एक खंबीर विश्रांतीस्थळ


आई तू सांग ना ग ...

प्रश्न माझा निरंतर भाबडा

कसा होऊ तुझा उत्तराई ?

कशी फेडावी तुझी ऋणाई   


Rate this content
Log in